स्वत:च्या चित्रावर मृत्यू दिनांक लिहून आत्महत्या

On: July 17, 2020 7:43 PM


कासा – डहाणू तालुक्यातील निंबापूर (महालपाडा) येथील तिशीतील तरुण चित्रकला शिक्षक गंगाराम रमेश चौधरी यांनी आपले स्वतःचे चित्र रेखाटले. त्यावर मृत्यू दिनांक लिहून फोटोला हार घालून गळफास घेत आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

गेल्या काही दिवसापासून पत्नी माहेरी निघून गेल्याने गंगाराम चौधरी विचलित झाले होते. चित्रकलेत पारंगत असलेले गंगाराम चौधरी यांनी ८ जून २०२० रोजी आपले स्वतःचे चित्र रेखाटले.

त्या चित्रावर १५-७-२०२० बुधवार मृत्यू दिनांक लिहीली. आपल्याच चित्राला हार घालून त्याचा फोटो काढला. तो फोटो व्हॉटस अपद्वारे एका नातलगाला पाठवला.

घरात कुणी नसतांना बुधवारी गंगाराम चौधरी यांनी स्वतःच्या राहत्य घरातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. गंगाराम चौधरी हे चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न सन 2016 साली झाले होते.

यांना एकही अपत्य नसल्याचे सांगितले जात आहे. माहेरी गेलेली पत्नी बरेच दिवस झाले तरी आलीच नाही. त्यांच्या आत्महत्येचं कारण कौटुंबिक कलहातून असल्याचे म्हटले जात आहे.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद कासा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment