देवपूर -धुळे येथील आदिशक्ती कानुश्री प्राथमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक कौस्तुभ पाटील यांना राजनंदिनी फाऊंडेशन जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा सन 2021 -22 या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिक्षक दिनी या पुरस्काराची घोषणा राजनंदिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. एस.डी.वाघ यांनी केली आहे. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आजवर राबवले आहेत.
कौस्तुभ पाटील यांची विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सतत धडपड सुरु असते. विद्यार्थी गृहभेट, पालक संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन व आयोजन, मुक्तशिक्षण उपक्रम, बालजत्रेचे आयोजन, दप्तरविना शाळा, प्रश्नमंजुषा उपक्रम, पाढे व इंग्रजी गुणवत्ता वाढ उपक्रम असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ केली आहे.
त्यांच्या या उपक्रमांची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार असल्याचे राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.एस.डी.वाघ, जळगाव कुणबी मराठा वधुवर ग्रुप गौरी उद्योग समूह चे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांनी कळवले आहे. कौस्तुभ पाटील हे धुळे येथील रविंद्र उत्तम खैरनार (धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढ़ी व धुळे व नंदुरबार ग.स.बँकचे गटनेते) यांचे चिरंजीव आहेत.