जळगाव शहरापासून जवळच असलेल्या रामदेववाडी या लहानशा गावात जनमत प्रतिष्ठानच्या वतीने सहा जि.प. शिक्षकांना आदर्श गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यात गणेश बागुल, निलेश चौधरी, किशोर पाटील, शांताराम भंगाळे, सौ. शैला महाजन, सौ उज्ज्वला कुलकर्णी यांचा समावेश होता.
त्यानंतर गावातील मुलांना स्व. किसन नाले स्मरणार्थ संस्थेकडून नोटबुकचे मोफत वितरण करण्यात आले. सरपंचांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले, संजय कुमार सिंग, राजेंद्र वर्मा, शुक्ला सर, हर्षाली पाटील, अश्विनी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. प्रतिभा मेटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. सुशील पवार जि. प. शाळा शिरसोली प्र.न. यांनी आपल्या सुमधुर आवाजात सुत्रसंचलन केले.