तरुणीचा काढला गुपचूप व्हिडीओ ;आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : बांधकाम कामगारांना साहित्य ठेवण्यासाठी दिलेल्या खोलीतून घरमालकाच्या तरुण मुलीचा गुपचूप व्हिडीओ तरुणाने तयार केला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीसात रीतसर गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संबंधित व्हिडीओ मेकर तरुण आसिफ बेग यास अटक करण्यात आली आहे.जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी तरुणी तिच्या आई व भावासह राहते. त्याच्या घराशेजारी बांधकाम सुरु आहे.

बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी तरुणीच्या आईने बांधकाम कामगारांना खोली दिली आहे. दि.17 जुलै रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास फिर्यादी तरुणी घरात एकटीच होती.

त्यावेळी घरात बांधकाम कामगार तरुण अचानक आला. त्याने त्या तरुणीला मेमरी कार्ड दिले. त्यात तरुणीचे काही व्हिडीओ असल्याचे त्याने तिला सांगितले.घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार आईला न कळविता फोनवरुन शेजारच्यांना कळविला.

शेजारचे लोक आले व त्यांनी तरुणीला मेमरी कार्डमधील व्हिडीओ लॅपटॉपमध्ये तपासण्यास सांगितले. त्यात तिचे आक्षेपार्ह चित्रीकरण होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तरुणीच्या घरी तपास कामी गेले. मेमरी कार्ड देणार्‍या आतिफ याकूब बेग( 20 ) आझादनगर, पिंप्राळा हुडको याची चौकशी केली. त्यानेच तरुणीचा व्हिडीओ केल्याचे निष्पन्न झाले. तरुणीच्या फिर्यादीवरुन आसिफ याकूब बेग याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल, मुकेश पाटील, हेमंत कडकर , चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, शांताराम पाटील यांनी आरोपीस अटकेची कारवाई केली.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भोई
करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here