जळगाव – जळगाव शहरातील जुना आसोदा रस्त्यावरील परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेत तलवारीसह अटक केली आहे. संजय सदाशिव कोळी (जुना आसोदा रोड, काशिनाथ पाटील नगर जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, अनिल इंगळे, हवालदार अनिल देशमुख, कमलाकर बागुल, विजय चौधरी, आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील संजय कोळी यास पुढील कारवाईकामी शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.