बीड – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील पोलिस उपअधीक्षक पदी भारत राऊत यांची नेमणूक झाली आहे. एसीबीच्या पोलिस महासंचालकांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड येथील तत्कालीन उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांची सोलापूर येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी भारत राऊत यांची वर्णी लागली आहे. भारत राऊत यांनी यापूर्वी बीड जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षक, एसपींच्या पथकाचे प्रमुख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख, परळी ग्रामीण ठाणे प्रभारी, आर्थिक गुन्हे शाखा प्रभारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आदी जबाबदा-या निभावल्या आहेत.