कोंबींग ऑपरेशन दरम्यान संशयीत तरुण ताब्यात

On: September 8, 2021 2:08 PM

जळगाव – मध्यरात्री कोंबीग ऑपरेशन करत असतांना मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाला मेहरुण परिसरात एक संशयीत तरुण आढळला. सदर तरुण मेहरुण परिसरातील महादेव मंदीर परिसरात आपला चेहरा झाकून आपले अस्तित्व लपवून भितींच्या आडोशाला वावरतांना आढळून आला. तो काहीतरी समाजविघातक अथवा गैरकृत्य करण्याच्या तयारीत असल्याची शंका पोलिस पथकाला आली.

पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना ईम्रान सैय्यद, पोकॉ किशोर पाटील, पोकॉ सुधीर साळेव, पोकॉ गोविदा पाटील, पोकॉ मंदार पाटील, पोकॉ. साईनाथ मुढे आदींनी त्याचा पाठलाग केला असता तो जोरात पळू लागला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

त्याला एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणून त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपले नाव विशाल किशोर मराठे (21) रा. विश्वकर्मा नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण – जळगाव असे कथन केले. सुर्यास्त ते सुर्योदया दरम्यान संशयास्पदरित्या चोरी अथवा घरफाडी करण्याच्या हेतूने तो मिळून आल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध रितसर कारवाई करण्यात आली आहे. पो.कॉ. राकेश बच्छाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या विरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम 122 (ब) नुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment