हायप्रोफाइल जुगारावरील धाडीत तेरा अटक

यवतमाळ – यवतमाळ शहरात टाकण्यात आलेल्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावरील कारवाईत एकुण तेरा जणांना अटक करण्यात आली आहे. जाजु चौक परिसरातील एका सदनिकेत 7 सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईतील आरोपींमधे डॉक्टर, इंजीनिअर, वकिल तसेच काही प्रतिष्ठीतांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे.

नीलेश पीपरानी नावाच्या व्यक्तीने जाजू चौक परिसरातील सदनिकेत जुगार चालवल्याची माहिती पोलिस अधीक्षकांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने मध्यरात्री एकच्या सुमारास राजन्ना अपार्टमेंटमधील 401 क्रमांकाच्या सदनिकेवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी तेरा जण जुगार खेळतांना आढळून आले.

मनीष मालानी (44) बोरी अरब, सौरव मोर(41) मेन लाईन, विपुल खोब्रागडे (19) पाटीपुरा, राहुल शुक्ला (40) माईंदे चौक, नवल बजाज उर्फ अग्रवाल (55) स्टेट बँक चौक, नीलेश पीपरानी (43) राजन्ना अपार्टमेंट, प्रेमरतन राठी (44) गांधी नगर, रुपेश कडु (42) रा. धामनगाव रोड, सुनील अग्रवाल (53) गुरुदेव नगर, लक्ष्मीकांत गांधी (58) राजन्ना अपार्टमेंट, अनील मानधना (54) टिळकवाडी, अशोक भंडारी (60) सारस्वत चौक आणि कमलेश गंधेचा (48) माईंदे चौक अशी अटकेतील सर्वांची नावे आहेत.

अटकेतील सर्वांकडून 5 लाख 57 हजार रुपयांची रोकड, 16 मोबाईल, 9 दुचाकी असा एकुण 11 लाख 51 हजार रुपये मुल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील सर्व आरोपींविरुद्ध अवधुतवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि. प्रदीप परदेशी, स.पो.नि. अमोल पुरी, पोलिस उपनिरिक्षक भगवान पायघन, कर्मचारी गजानन डोंगरे, सुमीत पाळेकर, उल्हास कुरकुटे, सलमान शेख, किशोर झेंडेकर, मोहम्मद बगतवाले, निखिल मडसे, राजश्री जिद्देवाद यांनी कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here