जळगाव – जळगाव शहरातून जाणा-या गिरणा पंपींग रेल्वे लोखंडी पुलाजवळ असलेल्या रेल्वे लाईनवर अंदाजे 35 वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वे खांब क्रमांक 415/16 ते 415/14 अप लाईनवर हा मृतदेह आढळून आला.
कोणत्या तरी धावत्या रेल्वेखाली कापला गेल्यामुळे या अनोळखी तरुणाचा झाला असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी उप स्टेशन प्रबंधक जळगाव यांनी दिलेल्या खबरीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मयताच्या उजव्या हातावर शोभा असे नाव गोंदलेले आहे. त्याच्या अंगात निळा चौकडीचा शर्ट व भुरकट काळ्या रंगाची पॅंट व दाढी काळ्या रंगाची आहे.
मयताचा कुणी वारसदार मिळून आल्यास रामानंद नगर पोलिस स्टेशन येथे (फोन 0257-2282834), पोलिस नाईक प्रविण भोसले नेमणूक जिल्हापेठ पोलिस स्टेशन (9823880580) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.