मायलेकाची विहीरीत उडी घेत आत्महत्या

जळगाव – पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे विवाहित मुलासह आईची विहीरीत उडी घेत जिवनयात्रा संपुष्टात आणल्याची घटना उघडकीस आली आहे. सकाळी सात वाजता उघडकीस आलेल्या या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तथापी आईचा जिव वाचवण्यासाठी विहीरीत उडी घेतलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. प्रतिभा पंढरीनाथ पाटील (45) व नितीन पंढरीनाथ पाटील असे मृत मायलेकांचे नाव आहे.

पोहता येणा-या तरुणांनी दोघांचे शव विहीरीतून बाहेर काढले असून ते शवविच्छेदनकामी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here