अट्टल मोबाईल चोरटे एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा अट्टल मोबाईल चोरट्यांना अटक़ केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अक्षय उर्फ मॉडल उर्फ टकोरा मुकेश अटवाल व अक्षय आनंदा जावळे (दोघे रा. गुरुनानक नगर शनीपेठ जळगाव) अशी अटकेतील दोघा मोबाईल चोरट्यांची नावे आहेत.

अटकेतील दोघा चोरट्यांनी त्यांचा अजून एक साथीदार रोहीत उर्फ रोहन पंडीत निदाने (शनीपेठ जळगाव) याच्या मदतीने एक मोबाईल जळगाव शहरातील पांडे चौकातून व दुसरा रिंग रोड परिसरातील पायी चालणा-या इसमाच्या हातातून हिसकावला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झालेली आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल दोन्ही गुन्ह्यांची उकल झाली असून दोघा चोरट्यांना पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार विजय पाटील, युनूस शेख, हे.कॉ. जयंत चौधरी, संदीप साळवे, पोलिस नाईक विजय शामराव पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, पो.कॉ. पंकज शिंदे, चालक मुरलीधर बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here