शाळेचे बनावट दाखले देणा-या टोळीचा पर्दाफाश

On: September 11, 2021 11:53 AM

बीड – सैन्यभरतीसाठी जाणाऱ्या मुलांना शाळा-महाविद्यालयांचे नकली दाखले देणाऱ्या टोळीचा नाशिक व अहमदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचे बीड कनेक्शन देखील उघड झाले आहे. बीड येथील दोघा जणांचा यात समावेश असल्याची बाब उघड झाली आहे. शिरुर तालुक्यात असलेल्या एका महाविद्यालयाच्या नावाने बनावट टीसी दिला असल्याचे पोलिस तपासात तपासात उघड झाले आहे.

सैन्यभरतीसह इतर सरकारी नोकरीकामी प्रयत्न करणा-या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा बनावटी दाखला उपलब्ध करुन देणारी टोळी अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात सक्रीय होती. नाशिक पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागली होती. नाशिकसह अहमदनगर पोलिसांनी डमी उमेदवार पाठवून खात्री केली. त्यात खातरजमेत मारुती आनंदराव शिरसाठ (रा. जांभळी, जि.नगर) आणि दत्तू नवनाथ गर्जे (रा. अकोले, जि.नगर) या दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीत बीड जिल्ह्यातील कुंडलिक दगडू जायभाये (रा. अनपटवाडी, ता. पाटोदा) आणि मच्छिंद्र कदम (रा. मानूर, ता. शिरुर) यांची देखील नावे पुढे आली.

अधिक सखोल चौकशी दरम्यान अजय राजाराम टिळे (वाडीवारे, जि. नाशिक) आणि शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा. पिंपळगाव, जि. नाशिक) यांची देखील नावे पुढे आली. इतर चौघे फरार असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत.

विवाहित मेहुणीवर जवानाचा अत्याचार

शाळा कॉलेजचे बनावट दाखले, शिक्के या टोळीच्या ताब्यात आढळून आली आहेत. दोन हजार रुपयांमधे एक दाखला या टोळीकडून विक्री केला जात होता. पोलिस कर्मचारी विनोद शिवाजी मासाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाथर्डी (जि. अहमदनगर) पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment