पहिल्या पतीला सोडले, दुस-यासोबत केला घरोबा– तिस-याने केले संबंध, दिला नकार होण्यास नवरोबा

On: September 11, 2021 11:00 PM
imaginary image according to crime story

जळगाव – जळगाव शहरातील करिश्माचे (नाव बदललेले) वयाच्या विशीत योग्य वेळी लग्न झाले होते. जळगाव शहरातच राहणा-या तरुणासोबत करिश्माचे लग्न सन 2010 मधे झाले होते. लग्नानंतर करिश्माला एक मुल झाले. मुल झाल्यानंतर देखील तिच्या संसाराची गाडी रुळावर हवी तशी रुळलीच नाही. तिचे पतीसोबत काही केल्या जमेना. जेमतेम सहा वर्ष संसार केल्यानंतर तिने पतीसोबत सोडचिठ्ठी घेण्याचा निर्णय घेतला व तो निर्णय अमलात देखील आणला. करिश्माचा पतीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय तिच्या आईवडीलांना अजिबात मान्य नव्हता. त्यांनी तिच्या निर्णयला विरोध दर्शवला. मात्र पतीपासून वेगळे राहण्याच्या निर्णयावर करिश्मा ठाम होती. त्यामुळे तिच्यापुढे तिच्या आईवडीलांनी व पतीने हात टेकले. 

आता करिश्मा आझाद झाली होती. पहिल्या पतीपासून आझाद झालेल्या करिश्माचे वर्धा येथील एका तरुणासोबत सुत जमले. जळगावची करिश्मा वर्धा येथे राहणा-या तरुणाच्या प्रेमात पडली. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर लागलीच दुस-या वर्षी सन 2017 मधे तिने वर्धा येथील तरुणासोबत लग्न केले. वर्धा येथील तरुणासोबत लग्न झाल्यामुळे तिने जळगाव सोडून दुस-या पतीसोबत वर्धा येथे राहण्यास सुरुवात केली. जळगावची माहेरवाशीन आता वर्धावासी झाली. पहिल्या पतीपासून झालेले मुल तिच्या पहिल्या पतीसोबतच रहात होते. त्यामुळे ती मुक्त होती. दुस-या पतीसोबत तिचा संसार सुरु झाला. मात्र तिचा दुसरा विवाह देखील फार दिवस टिकून राहिला नाही. दुसरा पती त्रास देतो या कारणाखाली ती वारंवार जळगावला माहेरी येवू लागली.

जळगावला तिच्या माहेरी आजीच्या घराजवळच एक तरुण रहात होता. कमलेश मखीजा असे त्या तरुणाचे नाव आहे. कमलेशच्या आई व बहीणीकडे करिश्माचे नेहमी येणे जाणे होते. कमलेशच्या आई व बहिणीकडे करिश्मा तिच्या दुस-या पतीपासून होणारा त्रास कथन करत होती. त्यामुळे त्या दोन्ही महिला तिला सहानुभुती दाखवत होत्या. त्यावेळी तिची व कमलेशची नजरानजर होण्यास वेळ लागला नाही.

गेल्या मे महिन्यात करिश्मा वर्धा येथून जळगावला आली होती. त्यावेळी कमलेशने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने कमलेशची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारताच कमलेशची कळी खुलली. त्याने हळूच तिला तिचा मोबाईल क्रमांक मागीतला. तिने देखील त्याला आपला मोबाईल क्रमांक लगेच देऊन टाकला. त्यानंतर कमलेशने पाय पसरण्यास सुरुवात केली. त्याने तिच्यासोबत मोबाईलवर थेट संभाषण सुरु केले. त्याने देखील तिला सहानुभुती दाखवण्यास सुरुवात केली. पहिल्या पतीला सोडले व दुस-याने त्रास देण्यास सुरुवात केल्याचे म्हणत तो तिचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करु लागला.

त्यानंतर काही दिवसांनी करिश्मा आपल्या सासरी वर्धा येथे निघून गेली. वर्धा येथे तिचा पतीसोबत काहीतरी घरगुती कारणावरुन वाद झाला. तिने लगेच तो वाद कमलेशच्या बहिणीकडे मोबाईलवर कथन केला. कमलेशच्या बहिणीने तिला सल्ला दिला की तू जळगावला येऊन जा. संसार म्हटला म्हणजे किरकोळ वाद सुरुच असतात. मात्र कमलेशच्या बहिणीने दिलेल्या सल्ल्याचे लगेच पालन करत ती वर्धा सोडून जळगावला येण्यास निघाली.

जून 2021 मधे करिश्मा माहेरी जळगावला आली. करिश्मा जळगावला आल्याचे समजताच कमलेशची कळी अजुनच खुलली. तो तिला घेण्यासाठी थेट जळगाव रेल्वे स्टेशनवर गेला. त्याने तिचे हसतमुखाने स्वागत करत तिला डबलसीट बसवून थेट त्याच्या घरीच आणले. आईवडीलांकडे जाण्याऐवजी ती कमलेशच्या घरीच राहिली. आता मोबाईलवर बोलण्याऐवजी ती प्रत्यक्षात त्याच्या घरीच आलेली होती. बघता बघता कमलेशसोबत तिचा नजरेचा खेळ नव्या दमाने सुरु झाला. या नजरेच्या खेळात तिचे कमलेशवर प्रेम बसले. कमलेशच्या बहिणीने करिश्माला अजून एक सल्ला दिला की तू तुझ्या पतीपासून घटस्फोट घे. आम्ही तुझे लग्न कमलेशसोबत लावून देऊ.

चंचल मनाची करिश्मा लागलीच कमलेशसोबत लग्न करण्यास तयार झाली. पहिल्या पतीला घटस्फोट दिला असतांना दुस-यासोबत घरोबा सुरु असतांना ती आता पुन्हा घटस्फोट व तिसरे लग्न करण्याच्या विचारात लागली. एके दिवशी ती हॉलमधे झोपली असतांना कमलेशने तिच्यासोबत जवळीक साधत नको ते कृत्य केले. त्यानंतर तो वेळोवेळी तिच्यासोबत ते कृत्य करु लागला. हा प्रकार नंतर नित्याचाच झाला.

एके दिवशी कमलेशला काही रकमेची गरज पडली. त्याने करिश्माला पैशांची मागणी केली.करिश्माने पतीला खोटेनाटे कारण सांगून पैसे मागीतले व ते पैसे कमलेशला दिले. त्यानंतर कमलेश बहकला.आपल्याला करिश्माकडून सुख मिळते व मागितल्यावर पैसे देखील मिळतात हे त्याच्या लक्षात आले. त्याने तीच्यासोबत लाडीगोडी लावून बघता बघता जवळपास सव्वा दोन लाख घेतले.  त्या पैशात कमलेशने दुचाकी देखील घेऊन टाकली.

काही दिवसांनी तिने त्याला पैसे परत मागीतले असता तो टाळाटाळ करु लागला. तसेच लग्न करण्यास देखील नकार देऊ लागला. त्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. पोलिसात तक्रार दिल्यानंतर कमलेशने तिचे पैसे व त्या पैशातून घेतलेली दुचाकी तिला परत दिली.  लग्न करण्याचे आमिष दाखवत आपल्यासोबत संबंध प्रस्थापित केले व नंतर लग्न करण्यास नकार दिला म्हणून करिश्माने कमलेश मखीजा याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment