तरुणाचा धारदार शस्त्राने खून

On: September 12, 2021 11:04 AM

औरंगाबाद – ढोरकीन शिवारात अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला करत एका पंचवीस वर्षाच्या तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवार 11 सप्टेबरच्या सकाळी उघडकीस आली. संदीप सूर्यभान साळवे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

ढोरकीन शिवारात असलेल्या एका शेतशिवारात मयत संदिप सूर्यभान साळवे (आंबेडकरनगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद) हा गेल्या काही महिन्यांपासून मजुरी करत होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्याला धारदार हत्याराने जिवे ठार केल्याची माहिती पैठणचे डिवायएसपी गोरख भामरे यांच्यासह पैठण एमआयडीसी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. भागवत नागरगोजे व पीएसआय दिलीप चौरे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी मयताचा भाऊ राधाकिसन साळवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार पैठण औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment