पत्नीच्या अनैतिक संबंधाने त्रस्त तरुणाची आत्महत्या

On: September 13, 2021 10:59 AM

अक्कलकोट – पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे  त्रस्त झालेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली उत्तर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली असून सुनेसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राम महिपती सोलंकर (32) रा. बादोला असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राम सोलंकर याने 6 सप्टेबर रोजी सकाळी दहा वाजता गळफास घेतल्याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर अंबिका राम सोलंकर, शंकर बसवराज बिराजदार, तानाजी दिगंबर सोलंकर (रा. बादोला बुद्रुक ता अक्कलकोट ) या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत अंबिका सोलंकर हिला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment