मलकापूर – मलकापूर शहरातील पारपेठ परिसरात गेल्या 1 फेब्रुवारी रोजी जबरी चोरीचा प्रकार झाला होता. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींच्या ताब्यातून सहा लाख रुपये मुल्याचे बारा तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.
रुक्सानाबानो मो.सईद व त्यांची मुलगी समरीन जाफर अशा दोघी जणी घराच्या दरवाज्याला आणि बाहेरील मेन गेटला लॉक करुन बाहेर गेल्या होत्या. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास दोन्ही मायलेकी घरी आल्या असता त्यांना मेन गेटचे कुलूप व घराच्या दरवाज्याचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसून आले. सोन्याचे दागदागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घरातून सोन्याच्या दागिन्यांसह 7 लाख 56 हजार 380 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी रुक्साना बानो यांनी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासा प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी शेख वाजीद शेख साजीद उर्फ सोनु, रा.शहापुरा पारपेठ, यास ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसी खाक्या बघताच त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याने त्याचा साथीदार भिकन शहा रहेमान शहा याच्या मदतीने घरफोडी केल्याचे कबुल केले. त्यामुळे त्याला देखील अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून पाच तोळे सोने जप्त करण्यात आले.
पत्नीच्या अनैतिक संबंधाने त्रस्त तरुणाची आत्महत्या
पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत, डिवायएसपी अमोल कोळी, पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुखदेव भोरकडे, पोलिस उपनिरीक्षक विश्वजीत ठाकूर, पो.ना. संजय पढार, पो.कॉ.संतोष कुमावत, पो.कॉ. आसिफ शेख, पो.कॉ.ईश्वर वाघ, पो.कॉ. अनिल डागोर, पो.कॉ.सलिम बर्डे, पो.कॉ.गोपाल तारुळकर यांनी तपासात सहभाग घेतला.







