पिंपरी : कोरोना रुग्ण संख्येने पिंपरी-चिंचवड शहरात दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. असे असले तरी परदेशी महिला आणि तरुणी देहविक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याकामी व्हाटसअपचा त्यांच्याकडून वापर सुरू होता.
चाळीस वर्षांची महिला व तिच्यासोबत असलेल्या २५ वर्षाच्या तरुणीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस स्टेशनच्या महिला स.पो.नि. सपना देवतळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरोपी मूळच्या युगांडा येथील आहेत. त्या दोघी पिंपरी-चिंचवड शहरात भाडयाच्या घरात रहात होत्या.
व्हॉटसअप क्रमांकावरून त्या दोघी ग्राहकांशी संपर्क साधून देहविक्रीचा व्यवसाय करत होत्या. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच वाकड पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेत कारवाई केली. भारतातील रहिवासाची त्यांच्या विसाची मुदत संपली आहे. त्या दोघी बेकायदेशीररित्या रहिवास करत असल्याचे देखील पोलीस तपासात पुढे आले आहे. शहरात कोरोनाच्या विषाणूचा प्रसार वाढत आहे.
त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तरीही हा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. उपजीविका भागविण्यासाठी देहविक्री करत असल्याचे आरोपीतांनी पोलिसांना सांगितले.