दरोड्याच्या प्रयत्नातील तिघांना शस्त्रासह अटक

On: September 13, 2021 1:18 PM

यवतमाळ – दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील तिघा जणांना शिरपूर पोलिसांच्या पथकाने शस्त्रासह त्याब्यात घेत अटक केली आहे. मोहसीन निसार शेख, शाहरुख शहादतुल्ला कुरेशी आणि ताहीद अहमद कुरेशी (तिघे रा. घुग्गुस जि. चंद्रपूर) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

शिंदोला ते कळमना रस्त्यावर बंद असलेल्या शालीवाहन एनर्जी लिमिटेड या कंपनीत रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने काही तरुण येणार असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना समजली होती. त्या माहीतीच्या आधारे पोलिस निरीक्षक सचिन लुले यांच्यासह अधिकारी – कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता.

चारचाकी वाहनाने आलेल्या तिघांना दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी कोयते, कुऱ्हाड, दोरी, दोन लोखंडी आरी पत्ते, आणि मोबाईल असा घातक मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला. मात्र इतर तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पो.नि. सचिन लुले, पोलिस उपनिरिक्षक राम कांडुरे, पोलिस नाईक प्रमोद जुनुनकर, गुणवंत पाटील, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, आशिष टेकाडे, अभिजीत कोशटवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment