धावत्या रेल्वेखाली झोकून देत तरुणाची आत्महत्या

On: September 14, 2021 3:32 PM

जळगाव : म्हसावद ते माहेजी दरम्यान रेल्वेच्या अप लाईनवर आज सकाळी तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी साडेआठ वाजेपुर्वी घडलेल्या या घटनेबाबत रेल्वे स्टेशन मास्टर यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

सागर गणेश खडसे (22) रा. दहीगाव संत ता.पाचोरा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सागर खडसे हा तरुण घटनास्थळी का व कसा आला? त्याने आत्महत्या का केली? ही सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment