डॉ. उल्हास पाटील कॉलेजात कोरोना नियमांना फाशी!!– श्रींचे विसर्जन जल्लोषात, मिळणार का कारवाईची राशी?

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) – कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासन सतर्क आहे. हा धोका लक्षात घेता गणेशोत्सव कालावधीत जल्लोष टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असे असले तरी जळगाव – भुसावळ महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गणपती विसर्जनाच्या वेळी या सर्व मार्गदर्शक सुचना पायदळी तुडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गणरायाची उत्साहात स्थापना झाली. गणपती विसर्जनाच्या वेळी महाविद्यालय प्रांगणात मोठ्या आवाजात ढोलताशांसह वाजंत्री सुरु होती. तसेच यावेळी काही विद्यार्थी व शिक्षक गर्दी करुन नाचण्यात तल्लीन व धुंद झाले होते. या घटनेचे काही व्हिडीओ क्राईम दुनियाच्या हाती लागले आहेत.

डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात कोरोना नियमांचे नियम पायदळी तुडवत गणपती विसर्जनाच्या वेळी करण्यात आलेला जल्लोष

या मिरवणूकीत एकाच्याही मुखावर मास्क नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा पुर्णपणे फज्जा उडाला होता. कोरोना नियमांचे पुर्णपणे उल्लंघन झाल्याचे यावेळी दिसून आले. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींकडूनच कोरोना नियमांसह गृह विभागाने जारी केलेल्या नियमांचे पुर्णपणे उल्लंघन झाल्याचे यावेळी दिसून आले. या कृत्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील जाणकार व्यक्तींकडूनच कोरोनाच्या तिस-या लाटेला जणू काही आमंत्रण देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव कालावधीत गर्दीला लगाम घालण्यासाठी गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनीक मंडळाच्या गणपतीचे मुखदर्शन देखील भाविकांना मंडपात प्रत्यक्ष जावून घेता येणार नसल्याचे या सुचनांमधे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नये असे मार्गदर्शक सुचनांमधे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी देखील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणूकीत कोरोनाचे सर्व नियम तुडवण्यात आले. या महाविद्यालयावर कारवाई होणार काय? असा प्रश्न या निमीत्ताने विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here