मुलीचे अपहरण करणाऱ्या पोलिसाला जामीन

On: September 15, 2021 3:20 PM


नाशिक : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. संशयित पोलिस कर्मचा-याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार म्हसरुळ पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. दिपक जठार असे नाव असलेल्या संशयिताला नांदूरनाका येथे अटक करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातील मुलीची कारमधून सुखरूप सुटका देखील करण्यात आली होती.

संशयीत पोलिस कर्मचारी दिपक जठार यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान संशयीताच्या वकिलांनी त्याच्या जामीनाचा अर्ज सादर केला. सदर जामीनासाठीचा अर्ज न्यायालयाने मंजुर केला आहे. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यासोबत कुठलेही गैरकृत्य झाले नसल्याचे समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment