जळगाव – अल्पवयीन मुलीस फुस लावत पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीविठ्ठल नगर भागातील रहिवासी असलेल्या महिलेची सुमारे सतरा वर्षाची मुलगी 14 सप्टेबरच्या दुपारपासून बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेऊन देखील ती सापडली नाही. अखेर तिच्या आईने रामानंद नगर पोलिस स्टेशन गाठत अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करत आहेत.