अजित पवारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य महिलेवर शिक्रापूर पोलिसात गुन्हा

On: July 18, 2020 6:09 PM

शिक्रापूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वप्नील अरुण गायकवाड (३२) रा. कोंढापुरी ता. शिरूर जि. यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

कोंढापुरी (ता. शिरूर) ग्रा.प.चे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड हे त्यांचे फेसबुक अकाउंट बघत होते. दरम्यान त्यांना त्यांच्या फेसबुकवर एका महिलेने लाईव्ह येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व रा.काँ.च्या इतर नेत्यांबद्दल आक्षेप घेणारे वक्तव्य केल्याचे दिसून आले.

त्यांनतर स्वप्नील गायकवाड यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली .शिक्रापूर पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिक्रापूर पोलीस  करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment