पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

On: July 18, 2020 10:26 PM

उल्हासनगर : शहरातील गायकवाड पाड्यात राहणाऱ्या सचिनगोंडाणे याने जेवणाच्या वादातून काल सायंकाळी पत्नीच्या डोक्यातदगड घालून तिचा खून केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संशयित पती सचिन याला अटक केली आहे.उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील गायकवाड पाड्यात सचिन गोंडाने हा त्याची पत्नी व दोन मुलांसह रहात होता. काल दुपारी जेवणाच्या वादातून पती -पत्नीचे जोरदार भांडण झाले.

संतापाच्या भरात सचिनने सायंकाळी पत्नी चंद्रकला हिस मारहाण करून तिला ओढणीने घरातील खांबाला बांधले. त्यानंतर तिच्या डोक्यात दगडी पाटा हाणला. रक्ताच्या थारोळ्यातचंद्रकलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सचिनचा भाऊ घरीआल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस झाला.

शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. सचिन यास अटक करण्यात आली. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पती – पत्नीच्या भांडणात दोन निरागस  मुले अनाथ झाली. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करतआहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment