जळगाव – जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आले असतांना देखील विना परवानगी विनामास्क वावरत असलेल्या दोघा तरुणांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध रितसर कारवाई केली आहे.
पहिल्या कारवाईत विशाल राजु अहिरे (आदित्य चौक रामेश्वर कॉलनी) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव शहर व तालुका हद्दीत राहण्यास प्रतिबंधीत केले असतांना देखील तो वास्तव्य करत असल्याचे पोलिस तपासणीत आढळून आले. दुस-या कारवाईत ललित उर्फ सोनु गणेश चौधरी (रा. इश्वर कॉलनी जळगाव) या तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे.
दोघांविरुद्ध भा.द.वि.188 व 269 नुसार त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पो.नि. शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील,पो.ना.सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, पो.कॉ. सतिष गर्जे, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, गोविंदा पाटील, हेमंत कळसकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
आईच्या चारित्र्यावर बाप नेहमीच करायचा आरोप चाकूच्या घावात मुलांनी संपवला त्याचा खटाटोप