महिलांचे गाऊन परिधान करुन चोरीचा अजब धंदा– औरंगाबाद एलसीबीने आवळला कारवाईचा फंदा !

On: September 21, 2021 11:20 AM

औरंगाबाद (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) – चोर हुशार असला तरी पोलिस त्यापेक्षा हुशार असतात. दिवसरात्र गुन्हेगारांच्या युक्त्या – क्लुप्त्या बघून बघून पोलिस देखील गुन्हेगारी ओळखण्यात सरावलेले असतात. चोरी करतांना कुणी ओळखू नये तसेच सीसीटीव्हीत दिसला तरी ओळख लपवण्यासाठी एका चोरट्याने चक्क महिलांचा गाऊन घालून चो-या करण्याची अजिबोगरीब युक्ती शोधून काढली. मात्र पोलिस त्यापेक्षा हुशार असल्यामुळे गाऊनमधील त्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात औरंगाबाद एलसीबी पथकाला यश आले. नईम ऊर्फ चुन्नू उस्मान शहा (37), सईदा कॉलनी, जटवाडा रोडऔरंगाबाद असे त्या चोरट्याचे नाव आहे. मयूर नगरात घरफोडी केल्याचे त्याने कबुल केले आहे.

कडुबाई बालाजी चाथे (म्हसोबानगर, हर्सूल) यांच्या पतीवर शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी कडूबाई यांनी घराला कुलूप लावून दवाखान्यात गेल्या होत्या. त्यांच्या बद घरावर नईम शहा याने पाळत ठेवली होती. त्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडले. घरातील सहा तोळे वजनाचे सोन्यासह इतर चिजवस्तूंवर नईम शहा याने हात साफ केला. याप्रकरणी दाखल गुन्हाचा तपास सुरु होता.

एलसीबीचे पोलिस निरिक्षक अविनाश आघाव व त्यांच्या सहका-यांनी केलेल्या तपासात नईम शहा गळाला लागला. चौकशीअंती सिडको, मयूर पार्क, जटवाडा परिसरात  महिलांचे गाऊन घालून चो-या, घरफोड्या केल्याचे त्याने कबुल केले. विविध घरफोड्या त्याच्या कबुलीतुन उघड झाल्या आहेत. सीसीटीव्हीत कैद झाला तरी ओळख पटू नये यासाठी त्याने गाऊन घालून चोरी करण्याची शक्कल लढवली होती. मात्र पोलिस तपासात त्याचा गुन्हा उघड झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment