औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाची बदलली कमांडींग पॉवर

On: September 21, 2021 3:07 PM

औरंगाबाद – औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आणि अप्पर पोलिस अधिक्षक बदलले आहेत. जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची कमांड आता पोलिस अधिक्षक निमीत गोयल व अप्पर पोलिस अधिक्षक पवन बनसोडे यांच्या हाती आली आहे.

पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या जागी आलेले निमित गोयल यांनी यापुर्वी रत्नागिरीसह मुंबई सशस्त्र दलाचे पोलिस उपायुक्तपदी कामगिरी बजावली आहे. निमित गोयल हे सन 2014 च्या बॅचचे  आयपीएस अधिकारी असून शिक्षण लखनऊ येथे पुर्ण केले आहे. पवन बनसोडे हे सन 2016 च्या बॅचचे अधिकारी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment