देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये होणार मोफत उपचार

जळगाव : जळगाव – शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना लागू झालेली आहे. त्यामुळे या रुग्णालयात अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवेचा मोफत लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांवरील सेवाभावी आणि अत्यंत यशस्वी उपचारानंतर गेल्या 22 जुलैपासून हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी आरोग्यसेवेसाठी सुरु करण्यात आले आहे. सदर रुग्णालयात सर्व अत्याधुनिक यंत्रणा, तंत्रज्ञ व विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे. श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील सर्व सेवा-सुविधांची काटेकोर पाहणी, पडताळणी राज्य व केंद्र शासनाच्या समितीने नुकतीच पूर्ण झाली आहे. या समितीने दिलेल्या अहवालानुसार शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनांची मंजुरी रुग्णालयालास मिळाली आहे. आता या रुग्णालयात गरजू, सामान्य व गरीब रुग्णांवर योजनेच्या अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

शासनाच्या योजना अनेक रुग्णालयांना लागू झाल्या असल्या, तरी एकाच छताखाली मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड पंचतारांकित आरोग्यसेवा व विविध आजारांवरील उपचार एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मोफत उपचारासाठी नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. या मोफत उपचारात विविध प्रकारच्या महागड्या शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार संपूर्ण अध्यावत यंत्रणा, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, संपूर्ण प्रशिक्षित आणि विनम्र असा नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे रुग्णांना मोफत उपचार घेताना रुग्णालयातील उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांचा लाभ घेण्याचे समाधान निश्चित मिळणार आहे.

देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये रुग्णांवर योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज असे स्वतंत्र विभाग तत्पर ठेवण्यात आले आहेत. त्यात मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया, मूत्रविकार व किडनीचे विकार, क्रिटिकल केअर मेडिसिन, प्लास्टिक शस्त्रक्रिया यासाठी सुपरस्पेशलिटी विभाग कार्यरत आहेत. याशिवाय बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूती शस्त्रक्रिया, जनरल शस्त्रक्रिया, अपघातातील जखमींवरील शस्त्रक्रिया, दंतरोग, त्वचा व गुप्तरोग, छातीचे विकार, फिजिओथेरपी विभाग या स्पेशालिटी विभागाद्वारे उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. रुग्णालयात स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब उपलब्ध असून 14 घाटांचा अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा आयसीयू विभाग उपलब्ध आहे. त्याला जोड म्हणून गरजू रुग्णांना 24 तास ऑक्सिजनची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी रुग्णालयाचा स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. रुग्णालयासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. नितिन पाटील (मो. क्रमांक 9422977071 व 7507724200) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here