छु मंतर केल्याच्या संशयातून तरुणाची हत्या उघडकीस

अमरावती – तंत्र – मंत्र व हकीमचे काम करणा-या तरुणामुळेच आपल्या परिवारातील लोक आजारी असतात या संशय व गैरसमजातून झालेल्या हत्येचा उलगडा अमरावती एलसीबीने केला आहे. या प्रकरणी एकाला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. छु मंतर केल्याच्या संशयातून 3 सप्टेबर रोजी संशयिताने तंत्र मंत्र विद्या जाणाणा-या तरुणाची हत्या केली होती. हत्येनंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून देण्यात आला होता. फईमोद्दीन नसरोद्दीन काझी( 21 अबुबकर कॉलनी वलगाव रोड अमरावती) असे हत्या झालेल्या तर मोहम्मद वासिफ मोहम्मद हनीफ (22) प्रयागराज उत्तर प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

फईमोद्दीन हा तंत्र-मंत्र व हकिमचे काम करत होता. या कामाच्या निमीत्ताने तो विविध गावांना जात होता. मयत फईमोद्दीन याचा उत्तर प्रदेशातील सद्दामसोबत परिचय होता. सद्दामच्या कुटूंबातील सदस्य आजारी रहात असल्यामुळे त्याने फईमोद्दीन याला प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे बोलावले होते. त्याच्या बोलावण्याप्रमाणे फईमोद्दीन हा प्रयागराज येथे गेला होता. मात्र सद्दामच्या कुटूंबातील सदस्यांची प्रकृती सुधारली नाही. त्याला मुलगा झाला मात्र त्याची प्रकृती देखील व्यवस्थीत रहात नव्हती. फईमोद्दीन याच्यामुळेचे आपल्या परिवारातील लोक आजारी असतात असा सद्दामने मनाशी गैरसमज करुन घेतला.

त्या गैरसमजातून फईमोद्दीन यास संपवण्याचा विचार सद्दामने केला.3 सप्टेबर रोजी फईमोद्दीन याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून देण्यात आला होता. प्रयागराज येथील सद्दामने त्याचा साथीदार मोहम्मद वासिफ (उत्तर प्रदेश) याच्या मदतीने कट रचून फईमोद्दीन (अमरावती) याची हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, शेघाटचे पोलिस निरीक्षक देवेन्द्र ठाकूर, पोलिस निरीक्षक सूरज सुसतकर, टेकाडे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here