जुन्या वादातून जळगावात गोळीबार

On: September 23, 2021 11:07 AM

जळगाव – जुना वाद व पुर्ववैमनस्यातून जळगाव शहरातील कांचन नगर भागात आज सकाळी गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेमुळे कांचन नगर भागात खळबळ उडाली आहे. पुर्व वैमनस्यातून भुसावळ येथील तरुणाच्या हत्येची शाई ओली असतांनाच जळगाव शहरात तशाच स्वरुपाची दुसरी घटना घडल्यामुळे गुन्हेगारी वृत्ती पुन्हा आपले डोके वर काढत असल्याचे चित्र या निमीत्ताने दिसून येत आहे.

आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या चौघांनी आकाश सपकाळे या तरुणावर गोळीबार करण्यात आला. घटनेच्या वेळी प्रसंगावधान राखत आकाशच्या भावाने गोळीबार करणा-या तरुणाला ताब्यात घेत पकडून ठेवल्याने सर्वांचा जिव वाचला मात्र आकाश जखमी झाला.

जखमी आकाशला पुढील उपचारासाठी तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सामान्य रुग्णालयात जवळपास अडीचशे परिचीत व नातेवाईकांचा जमाव जमला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जखमी आकाशवर उपचार सुरु होते व गोळीबाराच्या वेळी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment