समाधी मंदीरातील तांब्याची छत्री चोरणारे अटक

जळगाव : शेतातील समाधी मंदीरातील दगडी शिलावर तांब्याची छत्री चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात अटक केली आहे. रामकृष्ण देवराम सैंदाणे व श्रावण संजय आव्हाड (दोघे रा. तुळजाई नगर रायपूर – ता. जळगाव) अशी त्यांची नावे असून त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील कुसुंबा येथील शेतात बोबडे बुवा महाराज यांचे समाधी मंदीर आहे. या मंदीरात तिस हजार रुपये किमतीची सहा किलो वजनाची तांब्याची छत्री लावण्यात आली होती. 22 सप्टेबरच्या सायंकाळी गावक-यांनी या मंदीरात पुजा अर्चा केली होती. त्यानंतर आज सकाळी तेथे तांब्याची छत्री नसल्याचे उघडकीस आले. छत्रीच्या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफ्फार तडवी, इमरान सैय्यद, सतिष गर्जे, सिद्धेश्वर डापकर व योगेश बारी यांच्या पथकाने शोध सुरु केला.

मंदीर परिसरात गवत काढणा-या इसमांनीच हा चोरीचा गुन्हा केल्याचे तपासात उघड झाले. तपासाअंती रामकृष्ण देवराम सैंदाणे (35) व श्रावण संजय आव्हाड (28) दोघे रा. तुळजाई नगर रायपूर ता. जळगाव यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश चौधरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here