देवकर हॉस्पिटलमध्ये गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव : आतापर्यंत कृत्रिम सांधेरोपण किंवा गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया म्हंटले म्हणजे. रुग्ण थेट मुंबई किंवा पुणे गाठत होते. मात्र खानदेशात आता हे चित्र बदलणार आहे. येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात गुडगे रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. दिवसागणिक येथे होणाऱ्या सांधेरोपण शस्त्रक्रियेद्वारे आता रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञांची टीम रुग्णांना मोठा दिलासा देऊन त्यांचा विश्वास संपादन करत आहे. डॉक्टरांनी लंगड्याचे पाय व्हावे, वासराची गाय व्हावे, आणि रुग्णांसाठी मायेचे पांघरूण घालणारी दुधावरची साय व्हावे हीच खरी रुग्णसेवा, याचा प्रत्यय येथील देवकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे रुग्णांना येत आहे.

जळगाव येथील रहिवासी सुरेखा पाटील (वय 78) यांच्यावर येथील डॉक्टरांच्या टीमने गुडघेरोपणाची अवघड आणि जिकिरीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. श्रीमती पाटील यांच्या गुडघ्यामध्ये चालताना असह्य वेदना होत असल्याने त्यांना चालणे देखील अवघड झाले होते. मात्र कृत्रिम गुडघेरोपणाने आता त्यांच्या वेदना कायमच्या दूर होणार आहेत. खानदेशातील गुडघ्याने त्रस्त असलेल्या सर्व रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.

श्रीमती सुरेखा पाटील यांना तीव्र मधुमेह रक्तदाब आणि हृदयाचाही आजार असल्याचे चाचण्यांमधून दिसून आले. त्यांना रक्त पातळ करण्याच्या गोळ्याही सुरू होत्या. अशा परिस्थितीत कोणतीही शस्त्रक्रिया करणे हे जिकिरीचे असते. त्यात ही तर कृत्रिम गुडघा रोपणाची शस्त्रक्रिया होती. ते आव्हान स्वीकारत येथील डॉक्टरांनी सुरेखा पाटील यांच्यावर आधी दोन दिवस विविध चाचण्या घेऊन उपचार केले. शस्त्रक्रियेसाठी त्यांची प्रकृती स्थिर केली आणि त्यांच्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय झाला. सांधे रोपण तज्ञ डॉ. निरंजन चव्हाण, अस्थिरोग तज्ञ डॉ. अभिजित पाटील, आयसीयू तज्ञ प्रियांका पाटील, भूलतज्ज्ञ, डॉ. आशी अन्वर, डॉ. स्नेहल गिरी व त्यांच्या टीमने शस्त्रक्रियेद्वारे सुरेखा पाटील यांच्या पायावर कृत्रिम इम्पोर्टेड गुडघे रोपणाची शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍या दिवसापासूनच त्या आपल्या पायावर उभ्या राहून “वाकर’ च्या सहाय्याने चालू लागल्या.देवकर रुग्णालयात सर्व चाचण्या व उपचार एकाच छताखाली उपलब्ध असल्याने सर्वच शस्त्रक्रियांमध्ये कमालीचे यश येत आहे.

ज्या रुग्णांना गुडघेदुखी असेल, त्यांना उभे राहण्यासाठी देखील असह्य वेदना होतात. या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कृत्रिम गुडघा सांधेरोपण अत्यंत आवश्यक आहे. अशा रुग्णांनी रुग्णालयाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर डॉ. नितिन पाटील मो क्रमांक 9422977071 व 7507724200 वर संपर्क साधावा, असे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here