जळगाव – भांडण सोडवण्यास गेलेल्या हॉटेल मालकास वरणगाव येथे करण्यात आलेल्या मारहाणीचा जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट आसोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. शनिवारी दुपारपर्यंत जळगाव शहरातील सर्व हॉटेल, वाईन शॉप बंद ठेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देण्यात आले आहे.
अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक नियम व कायदे लागू करण्यासह अवैध बनावट मद्य विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. वरणगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला.
या वेळी जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ॲड. रोहन बाहेती, शहर तालुकाध्यक्ष सतीश नारखेडे, सचिव पंकज जंगले, ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र चौधरी, जामनेरचे शंकर मराठे, चाळीसगावचे उदय पवार, भडगांव-पारोळाचे सुरेश मराठे आदींनी या संपात सहभाग घेतला होता.