जळगाव – रेशन दुकानाचा तपशिल माहिती अधिकारात मागणा-या अर्जदारास धमकावणा-या दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी हुसेन हसन खान (रा. तांबापुरा जळगाव) असे तक्रारदाराचे तर रमजान मुलतानी व फरीद मुलतानी असे विरुद्ध पक्षातील दोघांची नावे आहेत.
रेशन दुकानाचा परवाना रद्द झाल्यानंतर दुस-या व्यक्तीकडे गेलेल्या परवान्याबाबतची माहिती अर्जदार हुसेन खान यांनी माहितीच्या अधिकारात मागवली होती. त्याचा राग आल्याने रमजान मुलतानी व फरीद मुलतानी या दोघांनी हुसेन खान यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.