तलवार घेऊन फिरणारा अटक

On: September 27, 2021 4:02 PM

जळगाव – हातात तलवार घेऊन फिरणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने भल्या पहाटे ताब्यात घेत अटक केली आहे. सागर पुनम कंडारे (24) रा. सिद्धार्थनगर, रामेश्वर कॉलनी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला सिद्धार्थ नगर, रामेश्वर कॉलनी परिसरातून मध्यरात्री बारा वाजेनंतर अटक करण्यात आली आहे.

रात्र गस्ती दरम्यान पो.नि. शिकारे यांच्या निर्देशानुसार पोलिस उप निरीक्षक अनिस शेख, पोलिस नाईक सुधीर सावळे, हेमंत कळसकर, पो.काँ. चंद्रकांत पाटील, पो.कॉ. इमरान बेग आदींनी या कारवाईत सहभाग घेत सागर कंडारे यास अटक करण्याकामी सहभाग घेतला. सागर कंडारे याच्य ताब्यातून तिन इंच लांबीची लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. पो.कॉ. इमरान बेग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शस्त्र अधिनियम 4/25 नुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. संजय धनगर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment