जळगाव : शेतात विज पडल्याने सोनाली राजेंद्र बारेला ही चौदा वर्षाची विटनेर येथील बालिका ठार झाली आहे. रात्री पाऊस पडत असतांना अचानक विज कोसळल्याने त्यात सोनाली गत:प्राण झाली.
मयत सोनालीस सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी तिला मयत घोषीत केले. याप्रकरणी डॉ. श्रावणी हुंबे यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. सचिन मुंडे करत आहेत.







