जळगाव – पाचोरा येथील साहेबराव पांचाळ हा तरुण हिवरा नदीकाठी तोल सुटल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पाचोरा परिसरात खळबळ माजली आहे. पोहण्याची उत्तम शैली अवगत असतांन देखील तो स्वत:ल वाचवू शकला नाही. आठ दिवसांपुर्वी देखील शिंपी नामक एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असून त्याचा शोध अद्याप लागलेला नाही.
पावसाळ्यात रस्ते व पुलांची कामे करु नये असे शासनाचे परिपत्रक आहे. तरीदेखील पाचोरा नगर परिषदेने शहरातील मुख्य रस्ते फोडुन ठेवले असल्याचे दिसून येते. पाचोरा आणि कृष्णापुरी भागाला जोडण्यात येणारा महत्त्वाचा पुल पर्यायी व्यवस्था न करता तोडण्यात आला आहे. त्यामुळे जनतेची त्या रस्त्याने येणे जाणे थांबले आहे.
तोडण्यात आलेल्या पुलाजवळ जिव वाचवण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आलि नसल्याने नगरपरिषदेच्या कारभाराला जनता दोष देत आहे. या प्रकरणी नगरपरिषदेने जबाबदारी स्विकारुन पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाच्या परिवाराला योग्य ती मदत करावी अशी मागणी पाचोरा कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.







