नाशिकला कार सोडून दरोडेखोर पसार

नाशिक : पोलिसांच्या सतर्कतेने नाशिकच्या आडगाव शिवारातील छत्रपती चौक परिसरातील सराफी दुकानावर दरोड्याचा प्रयत्न फसला. पोलिसांच्या पाठलागाला वैतागून दरोडेखोरांनी आपल्या ताब्यातील कार सोडून पलायन करण्यात धन्यता मानली. याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी बीट मार्शल गस्तीदरम्यान कोणार्कनगर छत्रपती चौक परिसरात पोलिस कर्मचा-या नजरेस एक संशयित कार सराफ दुकानासमोर दिसली. दुकानासमोर उभ्या असलेल्या पाच संशयीतांना पोलिसांनी हटकले. एका जणाने पोलिस कर्मचा-याच्या हाताला झटका देत पलायन केले.

पोलिसांचे वाहन येत असल्याचे दिसताच सर्व संशयीत कार सोडून पळून गेले. त्यांचा पाठलाग केला असता ते हाती आले नाही मात्र त्यांची कार हाती आली. डीएल 3 सीबीझेड 6307 क्रमांकाच्या कारमध्ये पोलिसांना गावठी कट्टा, दरोडा टाकण्याचे साहित्य, लेदरचे पाकीट, गाडीचे आरसी बुक, लायसन्स, रफत अली याच्या नावाचे आधारकार्ड, बँकेचे फास्ट टॅग बुक, राजाराम भूमीराज निवासी या नावाचे नोटरी बाँड, गोवा मोटर्स प्रा. लि. गाडी दुरुस्त केल्याची पावती तसेच बग्गा लिंक मोटर्स लि. ३९४ पतपरगंज असा पत्ता असलेले एक कार्ड पोलिसांच्या हाती लागले. पुढील तपास पो.नि. इरफान शेख व त्यांचे कर्मचारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here