धुळे – धुळे येथील आसिम खान या तरुणाने युपीएससीच्या परिक्षेत देशात 558 वा क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. युपीएससीच्या परिक्षेत गगनभरारी यश घेणारे आसीम खान या तरुणाचे संपुर्ण शिक्षण ऊर्दू माध्यमातुन झाले असून त्याने परिक्षा देखील उर्दू माध्यमातूनच दिली आहे. भारतातून ऊर्दू माध्यमातुन परीक्षा उत्तीर्ण होणारे आसीम खान एकमेव उमेदवार असून ते यापुर्वी मुलाखतीस पात्र ठरले होते मात्र अंतिम निवड झालेली नव्हती. मात्र यावर्षीच्या अंतिम यादीत आसीम खान यांचे नाव निवड यादीत आले.
आसिम खान यांचे वडील किफायत खान यासीन खान हे धुळे महानगरपालिकेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहेत. त्यांची आई देखील शिक्षीका होती. त्यांच्या आईचे निधन झाले आहे. आसीम खान यांचे मोठे बंधू अब्दुल कय्युम खान शहादा नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक असून त्यांच्या दोन्ही बहिणी देखील शिक्षीका आहेत. धुळे जिल्ह्यातील या तरुणाने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.