बलात्कार करणा-या पॅरोलवरील गुन्हेगारास अटक

नाशिक : नितीन पवार या पॅरोलवर बाहेर आलेल्या व दोन महिलांच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या आरोपीस आज अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर बाहेर असतांना त्याने महिलेच्या ब्युटी पार्लरमध्ये अनाधिकारे जावून तिच्यावर 27 सप्टेबर रोजी बलात्कार केला होता.

या प्रकरणी अंबड पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत आरोपी नितीन पवार यास अटक केली आहे. पोलिसांच्या अभिलेख्यावर गुन्हेगार असलेल्या नितीन पवार याने सन 2013 मधे नाशिक – सिडको येथील दोघा महिलांचा धारदार शस्त्राने खून केला होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो पॅरोलवर बाहेर आला होता. बलात्कार प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आज अंबड पोलिस स्टेशनला भेट दिली असून आवश्यक त्या सुचना देखील दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here