जळगाव : जळगाव एमआयडीसी हद्दीतील सिंधी कॉलनी परिसरात आज मिलन डे सट्टा जुगारावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सट्टा खेळणा-या एकुण अठरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिंधी कॉलनी परिसरातील नेत्रज्योती सोसायटी नजीक असलेल्या खुबचंद साहित्या कॉंप्लेक्स मधे सुरु असलेल्या सट्टा जुगार अड्ड्याची माहिती सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांना समजली होती. त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली.
प्रकाश तोलाराम कुकरेजा, रा. सिंधी कॉलनी, जळगाव, सुरेश उर्फ डाबु मामा सिधराम भाट, व त्याचा मुलगा रोहीत सुरेश भाट (दोघे रा. नेत्रज्योजी सोसायटी जवळ, जळगाव) असे तिघे जण हा सट्टा जुगार अड्डा चालवत होते. या ठिकाणी पोलिस पथक गेल्यानंतर दहाने दुरी लाव असा आवाज पोलिसांना ऐकू आला व त्यांची खात्री झाली. त्यानंतर अधिकारी कुमार चिंथा यांच्या निर्देशनाखाली कारवाई करण्यात आली.
प्रकाश तोलाराम कुकरेजा, सुरेश उर्फ डाबु मामा सिधराम भाट, रोहीत सुरेश भाट यांच्यासह शांताराम बाबुराव पाटील (65) इच्छादेवी मागे, तांबापुरा, जळगाव, इम्रानखान हमीदखान (38) रा. तांबापुरा, जळगाव, गजानन वसंतराव लकडे (52) शनीपेठ चंदनवाडी, जळगाव, निलेश लक्ष्मीनारायण लढ्ढा (50) रा. प्लॉट नं. 42/3, विष्णु नागर, अशोक बेकरीजवळ, जळगाव, विनोद विठ्ठल सपकाळे (42) रा. समता नगर, जळगाव, पंडीत लखीचंद चव्हाण (41) रा. नेहरु नगर, जळगाव, कैलास झजेरीया बारेला (42) रा. कंजरवाडा, जळगाव, अशोक काशिनाथ नेवे (62) रा. श्रीधर नगर, रामानंद नगर, जळगाव, पांडुरंग भगवान नाभणे (68) रा. ईच्छादेवी मंदीराचे मागो, तांबापुरा, जळगाव, मुरलीधर विश्वनाथ चव्हाण (50) रा. सिंधी कॉलनी, जळगाव, 14) भिका राजु गुंडाळे (18) रा. बाटली कारखान्याजवळ, मेहरुण, जळगाव, अशोक सलामतराय मकडीया (62) रा. सिंधी कॉलनी, जळगाव, राजु बाबुराव पवार (42) रा. नेहरु नगर, जळगाव, बुधा मिराजी झणके (42) रा. समता नगर, जळगाव, अय्युब मेहबुब खाटीक (55) रा. शामा फायर जवळ, तांबापुरा जळगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या सट्टा खेळणा-या सर्व जणांची नावे आहेत. या कारवाईत एकुण 59900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात 31 हजार रुपये रोख, 26 हजार 700 रुपये किमतीचे मोबाईल, 3700 रुपये किमतीचे इतर साहित्य अशा मुद्देमालाचा समावेश आहे.
सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रमोद कठोरे, पो.उप.नि. अनिस पटेल, स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. इम्रानअली सैय्यद, पो.ना. योगेश बारी, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. सचिन पाटील तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पो.हे.कॉ. विजय महादेव काळे, चालक पो.हे.कॉ. कैलास गोंडु सोनवणे, पो.ना. रविंद्र सुकदेव मोतीराया, पो.ना. महेश हिलाल महाले आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.