जळगाव : मुकुंदा यशवंत सपकाळे (जिजाऊ नगर – वाघ नगर जळगाव) या तरुणास जळगाव तालुका पोलिसांच्या पथकाने तलवार व कोयत्यासह ताब्यात घेतले आहे. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याच्या कब्जात हत्यार आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलमानुसार रितसर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी दिपक साहेबराव कोळी यांनी फिर्याद दिली असून पो.नि. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नयन पाटील, हवालदार हरीलाल पाटील, नितीन पाटील, वासुदेव मराठे, पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड, धर्मेंद्र ठाकुर, पो.कॉ. दिपक कोळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.