जळगाव दि. 2 (प्रतिनिधी) –गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून 2 ऑक्टोबरला महानगर पालिकेच्या 17 मजली इमारतीपासून तर गांधी उद्यानापर्यंत अहिंसा सद्भभावना रॅली काढली जाते. यावर्षी समाजातील सर्व स्तरातील मोजक्या, प्रातिनिधीक सदस्याचा समावेश असलेली रॅली काढली गेली. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे सकाळी 7 वाजता रॅली काढण्यात आली परंतु मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला तरी देखील सदस्यांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदविला. रॅलीचा समारोप गांधी उद्यानातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून झाला.
यावर्षी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे अहिंसा सद्भभावना रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले. रॅलीची सुरूवात डॉ. सी.जी. चौधरी व अकील इस्माईल यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून केली गेली. रॅलीमध्ये समाजातील विविध क्षेत्रातील, स्तरातील जवळपास 30-35 व्यक्ती प्रातिनिधीक स्वरुपात सहभागी झाले होते. त्यात आ. राजूमामा भोळे, गुलाबराव देवकर, शंभू पाटील, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, आयएमएचे डॉ. राधेश्याम चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. किशोर पवार, रोटरी क्लबचे गनी मेमन, लायन्स क्लबच्या सौ. किरण गांधी, सिंधी समाज व व्यापारी प्रतिनिधी अमर कुकरेचा, दिव्यमराठीचे संपादक दीपक पटवे, नाट्यकर्मी तथा शिक्षिका सौ. मंजुषा भिडे, विष्णू भंगाळे, एजाज मलीक, शिक्षण क्षेत्राचे सतीश मोरे, उद्योजक किरण बच्छाव, क्रेडाईचे अनिस शहा, लक्ष्मीकांत मणियार, गांधी रिसर्च फाउंडेनशनचे समन्वयक उदय महाजन तसेच सहकारी आदी यावेळी उपस्थित होते.