जळगाव शहरातील दगडफेकीच्या घटनेवर नियंत्रण

On: October 3, 2021 8:23 AM

जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील आझाद नगरात शनिवारी रात्री दोन गटात निर्माण झालेल्या वादावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले असून शांतता आहे.

या घटनेत दोन गटात वाद झाल्याने मोठा जमाव जमून दोन्ही बाजूने दगडफेकीचा प्रकार घडला होता. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिसांचा ताफा हजर होता. दगडफेकीच्या या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

या परिसरात तरुण-तरुणी सोबत असतांना एक गटाने तरुणाला मारहाण सुरु केली. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाने रात्रीच रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी धाव घेतली असता दोन्ही बाजूने दगडफेकीचा प्रकार सुरु झाला. दरम्यान वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, क्यूआरटी पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संशयितांची धरपकड सुरु झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment