भुसावळ – राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या महापुरुषांच्या जयंतीनिमीत्त त्यांना अभिवादन करुन भारतीय राष्ट्रीय युवा परिषद तालुका कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा साई मंदीर खडका येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा परिषदेचे जिल्हा समन्वयक नयन पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून स्वराज्य पोलिस मित्र संघटना तालुका उपाध्यक्ष जयश्री इंगळे तसेच कमलाकर महाजन बळीराम माताडे, नयनसिंग पाटील, पंडित चौधरी, उदयसिंग पाटील, युवराज पाटील, शंकर महाजन व ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारणीमध्ये तालुकाध्यक्ष रितेश भारंबे, तालुका उपाध्यक्ष डिगंबर भिरुड, तालुका मुख्य सचिव सायली महाजन, तालुका कोषाध्यक्ष आकाश झांबरे, तालुका सचिव कोमल इंगळे, जागृत पाटील, वरुण बाविस्कर, तालुका समन्वयक राहूल फालक, रोहित पाटील, यश फालक, रितेश सोनवणे, काव्यांजली फेगडे आदींची पदाधिकारी पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.