जळगाव – कोरोनाची तिव्रता अधिक असतांना सराफ बाजाराला त्याचा फटका सहन करावा लागला. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर व बाजार पुर्ववत झाल्यानंतर सराफ बाजारात पुन्हा उत्साह दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी हा योग्य काळ असल्याचे देखील म्हटले जात आहे. पितृपक्षात देखील सोने – चांदी खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.
मध्यंतरी सोन्याच्या किंमती जवळपास 53 ते 55 हजारापर्यंत जावून भिडल्या होत्या. त्यानंतर अनेकदा सोन्याच्या किमतीत घसरण झाली व आजही सोन्याचे भाव बरेच आवाक्यात आले आहेत. काही महिन्यांपुर्वी व आताच्या सोन्याच्या किमतीत घसरण झाली असल्यामुळे ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी केली आहे. पितृपक्षात नविन खरेदी केली जात नसली तरी यावेळी घसरलेल्या सोन्याच्या किमतीचा फायदा ग्राहक घेत आहेत.