छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधे नट्टू काकाची भुमिका करणारे अभिनेते घनशाम नायक यांचे कॅन्सरने निधन झाले आहे. मृत्युसमयी ते 78 वर्षाचे होते. गेले कित्येक दिवसांपासून ते कॅन्सरसोबत झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी घनशाम नायक यांच्या निधनाची माहिती दिली आहे. घनशाम नायक हे नट्टु काका या नावानेच प्रेक्षकांमधे प्रसिद्ध झाले होते. या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नसरुद्दीन शहा यांच्या मासुम या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भुमिका केली होती.