जळगाव – लाथाबुक्क्यांनी एकास मारहाण केल्याच्या घटनेतील तिघांपैकी फरार असलेल्या एका आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. साजन बळीराम पवार (22) रा. रामदेब बाबा किराणा दुकानाजवळ सुप्रिम कॉलनी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
11 मे 2019 रोजी हार्दिक पाटील, अविनाश शिंदे व साजन बळीराम पवार अशा तिघांनी मिळून दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण यास त्याच्या घराबाहेर बोलावून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. अविनाश शिंदे याने त्याच्या हातातील लोखंडी आसारीने दिनकर यास मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यापासून सन 2019 पासून साजन पवार हा फरार होता. तो शहरात आला असल्याची माहिती पो.नि.शिकारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकास त्याच्या मागावर रवाना केले होते. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सतीश गरजे, सचिन पाटील, सुधीर साळवे आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. गेल्या दोन वर्षापासून आरोपी साजन पवार फरार होता.