माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या धडकेत पाच जण जखमी झाले आहेत. आज दुपारी लातुर नांदेड दौ-यावर असतांना गडगा-मुखेड रस्त्यावरील बेळी फाटा येथे सदर अपघाताची घटना घडली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर, नांदेड दौऱ्यावर होते. बेरळी येथे राजे छत्रपती अकॅडमी नजीक ताफ्यातील वाहनाने एका पोलिसासह दोन मोटरसायकल व एका मालवाहू जीपला दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाले. बालाजी शंकर पवार (26) रा.मांजरी, ता.मुखेड, राजेश व्यंकटराव जाधव (36) रा.मुखेड, जमादार नामदेव सायबू दोसलवार, समीर भीसे (37) व अरविंद मोरे (40) अशी जखमींची नावे आहेत.