पीएसआयविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी ग्रामस्थ आग्रही

बिड – गेवराई तालुक्यातील चकलांबा गावातील राम मंदिराचे पुजारी गणपत देशपांडे यांना पोलिस उप निरीक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या घटनेप्रकरणी सदर पोलिस उप निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी ग्रामस्थ आग्रही असून त्यांनी चकलांबा पोलिस स्टेशनला ठिय्या आंदोलन केले होते. दिगंबर पवार असे सदर पोलिस उप निरीक्षकाचे नाव आहे. मंदिराचे पुजारी गणपत देशपांडे यांना झालेल्या मारहाणीच्या वेळी पोलिस उप निरीक्षक दिगंबर पवार यांनी मद्यप्राशन केले होते असे म्हटले जात आहे.

चकलांबा येथील राममंदिर परिसरात शनिवारच्या संध्याकाळी काही मुले लघुशंका करत होती. मंदिराचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने पुजारी गणपत देशपांडे यांनी या मुलांना हटकले. त्या मुलांमधे पीएसआय दिगंबर  पवार यांच्या मुलाचा समावेश होता. त्या मुलाने सदर घटनेचा वृतांत घरी जावून आपल्या पीएसआय असलेल्या वडीलांना कथन केला. आपल्या मुलाला पुजारी रागावल्याचा राग आल्याने त्यांनी रात्रीच गणपत देशपांडे यांचे घर गाठले. माझ्या मुलाला का रागावले असे म्हणत  पवार यांनी देशपांडे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली.

दुस-या दिवशी सकाळी हा प्रकार ग्रामस्थांना समजला. ग्रामस्थांनी चकलांबा पोलिस स्टेशन गाठत पोलिस  उप निरीक्षक दिगंबर पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थांमधे नाराजी दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here